पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 Teacher Job vacancy near me Shikshak Bharti 2022 notification – राज्य शासनाने पारदर्शकपणे शिक्षकभरती teacher job करण्यासाठी पवित्र पोर्टल प्रणाली विकसित केली आहे. शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी ‘टीईटी’ व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. महाआयटी मार्फत पहिली अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा डिसेंबर 2017 मध्ये घेण्यात आली होती.
Teacher Job Teacher vacancy Shikshak Bharti 2022 शिक्षक भरती 2022
आगामी शिक्षक भरती बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आमच्या टेलिग्राम चॅनेल ला नक्की जॉईन करा.
Teacher Job
- नवोदय विद्यालय येथे विविध ठिकाणी २२०० जागांवर मेगाभरती
- फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे ९६ सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती
- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे ३०० सहाय्यक प्राध्यापकांची भरती
- पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदांसाठी भरती | Shikshak Bharti 2022
- केंद्रीय विद्यालय पुणे येथे विविध पदांची भरती
- भारती विद्यापीठ अंतर्गत ४९ रिक्त जागांसाठी भरती | Bharati Vidyapeeth Bharti 2022
- अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरु | COEP bharti 2022
- केंद्रीय विद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती | Kendriya Vidyalaya Pune Recruitment
- Army public school vacancy 2022 | आर्मी पब्लिक स्कूल येथे विविध पदांची भरती
- Swami Ramanand tirtha marathwada vidyapeeth nanded recruitment 2022
- NVS recruitment 2022 | Navodaya vidyalaya samiti recruitment 2022
- Bharati vidyapeeth recruitment | भारती विद्यापीठ मध्ये विविध जागांसाठी भरती
शिक्षक भरती 2022 Teacher bharti
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 8 जुलै रोजी राज्यातील सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भरती प्रक्रियेला सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती. राज्य सरकारच्या त्यानिर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांतील,शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जातील.
Teacher vacancy Shikshak Bharti 2022
पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शिक्षकांची पदभरती २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच केली जाण्याचे संकेत आहेत.
त्यासंदर्भातील वेळापक्षक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदांकरिताची ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती .
या परीक्षेचा निकाल ३१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठीची भरती राबविली जाणार असल्याची माहिती आहे.
शासनाच्या वेळापत्रकानुसार, २८ फेब्रुवारी रोजी टीएआयटी परीक्षा घेण्यात येईल आणि १० मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. मार्च महिन्यापासून राज्याच्या १३ पेसा क्षेत्रातील रिक्त पदभरतीसाठी जाहिरात देण्यात येईल.
१६ ते ३१ मार्चपर्यंत उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची मुदत देण्यात येईल. उमेदवार निवडीची ही प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येतील. असे आदेश मिळालेल्या उमेदवारांना नव्या शैक्षणिक सत्राच्या शाळा सुरू होताच रूजू करून घेण्यात येईल, अशी माहिती आहे.
आमचा टेलिग्राम चॅनेल किंवा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा