तलाठी भरती २०२२ संपूर्ण माहिती मराठी मधून

तलाठी भरती 2022

तलाठी भरती 2022, तलाठी भरती अभ्यासक्रम, तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म दाते, तलाठी भरती पात्रता परीक्षा, या पानावर आपल्याला तलाठी भरती जाहिरात संबंधी सर्व माहिती मिळेल, जसे कि वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, परीक्षेची तारीख

तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म दाते | तलाठी भरती जाहिरात

तलाठी भरती 2022 अद्याप जाहीर झाली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होईल. भरती जाहीर झाल्यानंतर आम्ही हे वेबेपज लगेच अपडेट करू तरी आपण या आमच्या वेबपेज ला भेट देत रहा.

तलाठी भरती अभ्यासक्रम

परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी उमेदवारांना महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2022 ची माहिती असणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2022 (अपेक्षित)

विषय :मराठी
शब्द प्रकार – नाम , सर्वनाम , क्रियाविशेषण , क्रियापद , विशेषण , पृथक्करण , संधि आणि संधिचे प्रकार, वाक्यांशांचा अर्थ आणि वापर,समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द
विषय : इंग्रजी
काळ आणि काळाचे प्रकार, क्वेश्चन टॅग, क्रियापदाचे योग्य स्वरूप,त्रुटी ओळखा, शब्दसंग्रह, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, सुविचार, पॅसेज आकलन, शब्दलेखन, वाक्य रचना
विषय : सामान्य ज्ञान
इतिहास, आंतरराष्ट्रीय घडामोडी, भारताचे संविधान, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, जिल्ह्याचा भूगोल, बँकिंग जागरूकता, संगणक जागरूकता, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळ, महाराष्ट्राचा इतिहास
विषय : गणित
वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घन मुळे, दशांश प्रणाली, टक्केवारी,सरासरी, नफा व तोटा, वेळ आणि काम, साधे व्याज, चक्रवाढ व्याज, वेळ आणि गती, त्रिकोण, आयत, चौरस, गोल, वर्तुळ इत्यादींचे क्षेत्रफळ, मिश्रण, वय, संख्या प्रणाली, बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार, लसावि आणि मसावि
टीप- वर दिलेला महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम मागील वर्षीच्या जाहिरातीनुसार आहे. महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2022 अधिकृत जाहिरात आल्यानंतर आम्ही अपडेट करू.

तलाठी भरती पात्रता

तलाठी भरती शैक्षणिक पात्रता

तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.

तलाठी भरती वयोमर्यादा

तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.

मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.

तलाठी भरती परीक्षा

महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती 2022 महत्त्वाची ठरू शकते. तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.

पुणे तलाठी भरती

महाराष्ट्रात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद असे सात महसूल विभाग आहेत. तर मुंबई व ठाणे या महसूल विभागांना एकत्र करून कोकाण हा एकच प्रशासकीय विभाग केल्याने राज्यात सहा प्रशासकीय विभाग आहेत.

तलाठी भरती संदर्भात इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


इतर महत्त्वाच्या भरती


आमचा टेलिग्राम चॅनेल किंवा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

nokari times telegram channel
nokari times whatsapp group

FAQ तलाठी भरती २०२२

Q.1 तलाठी भरती २०२२ परीक्षा केव्हा आहे ?

Ans. तलाठी भरती 2022 अद्याप जाहीर झाली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होईल.

Q.2 तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम कुठे मिळेल ?

Ans. तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम या वेबपेजवर दिलेला आहे

Q.3 तलाठी भरती शैक्षणिक पात्रता किती आहे ?

Ans. तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे.