Pune mahanagarpalika recruitment 2023 : महानगरपालिका नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छुक तरुणांसाठी पुन्हा एक संधी येत आहे. आगामी वर्षात पुणे महानगरपालिका अंदाजे ३०० जागांची भरती करणार आहे. या भरती मध्ये डॉक्टर, आरोग्य निरीक्षक, विद्युत अभियंता तसेच अग्निशमन दलातील पदे व इतर रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती संदर्भात जाहिरात ही जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केली जाईल.

Pune mahanagarpalika recruitment 2023

२०२२ या वर्षात पुणे महानगरपालिकेने ४४८ पदांसाठी भरती जाहिरात दिली होती. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये गेली १० वर्षे पदभरती झाली नसल्याने अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासनावर ताण येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने गेल्या वर्षी भरती प्रक्रियेवरील बंदी उठवली. यानंतर लगेच महानगरपालिकेने भरती प्रक्रिया सुरु केली होती. कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, विधी सहाय्यक यांसारख्या पदांसाठी ही भरती केली गेली. ही भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा