Police Bharti news – पोलीस भरती ची वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्वाची बातमी आली आहे. राज्याच्या गृह विभागात तब्बल 49 हजार 500 पदे रिक्त जागा असून
पहिल्या टप्प्यात 7 हजार 231 पदांची भरती होणार आहे. पुढील २ महिन्यात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पुढील काही महिन्यात 7 हजार 231 पदांची पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीबाबत गृह विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारने भरती पद्धतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आता आगामी भरतीवेळी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.